
सांगली, ता.२६ : शहरात आपघात एसटीच्या धडकेत महाविद्यालयीन तरुणीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. शर्वरी राजकुमार कुलकर्णी, वय २१ वर्ष, रा. हरिपूर या महाविद्यालीय विद्यार्थिनीचा आपघातात मृत्य झाला आहे. सांगली आंबेडकर रोडवर आज सकाळी साडे दहाचा सुमारास महाविद्यालयीन तरुणी तिच्या जुपिटर दुचाकीवरून आंबेडकर रोडने जात असताना समोरुन येणाऱ्या जमखंडी- मुबंई एसटी बसला तिची दुचाकी घासली यामध्ये मागील चाकाखाली सापडून तिचा जागीच मृत्यू झाला. ही घटना समजताच पोलिसांनी धाव घेतली. मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला असून आपघाताची नोंद करण्यात आली आहे.
घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की, सांगली आंबेडकर रोडवर आज सकाळी साडे दहाचा सुमारास महाविद्यालयीन तरुणी शर्वरी ही आपल्या दुचाकी जुपिटरवरून जात असताना समोरून येणारी जमखंडी – मुबई एसटी बसची धडक झाली या धडकेत एसटीचे मागील चाक शर्वरीच्या डोकयावरून गेल्याने शर्वरीचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर अपघातस्थळी मोठी गर्दी झाली. या अपघातामुळे आंबेडकर रोडवर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.
एसटी बस व दुचाकी आपघात
जमखंडी- मुबई एसटी बस बस क्रमांक-MH14 LX 5928 दुचाकी जुपिटर गाडी क्रमांक- MH10 CJ 2457 जुपिटर दुचाकी CJ 2457) यांच्या भीषण अपघातात एका महाविद्यालयात बीसीएचे शिक्षण घेत असलेल्या शर्वरीचा दुर्दवी जागीच मृत्य झाला. शर्वरीच्या वडिलांचे निधन झाले असून ती तिच्या आई व बहिणीसोबत हरिपूर येथे राहत होती.