खोकी धारकाच्या मागण्या बाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल – मनपा आयुक्त सत्यम गांधी

खोकी धारक यांची बैठक संपन्न

सांगली, ता.२६ : खोकी धारकाच्या मागण्या बाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल,नव्याने समिती स्थापन करून निर्णय घेता येईल असे मनपा आयुक्त सत्यम गांधी म्हणाले. पद्मभूषण डॉक्टर वसंत दादा पाटील सभागृह येथे सांगली मिरज कुपवाड महापालिका क्षेत्रातील सर्व खोकी धारकांची बैठक आज आयोजित बैठकीत ते बोलत होते.

खोकी धारकांची विविध मागणी

२००७ -८ मध्ये काढलेल्या खोकी धारकांना लावलेली थकबाकी माफ करावी, हस्तांतरित कमी करावी व स्वच्छता कर कमी करावा. ज्या खोकीधारकांचे पुनर्वसन झाले नाही त्यांचे लवकरात लवकर पुनर्वसन करण्यात यावे. खोकी धारकं संघटनेचे वतीने गणेश कोडते ,भाजप किसन मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष श्री पृथ्वीराज पवार यांनी सर्व खोकी धारकाच्या मागण्या बाबत सविस्तरपणे मांडल्या.

आयुक्त सत्यम गांधी

थकबाकी बाबत शासन स्तरावर निर्णय घेतला जात असल्याने सदरचे प्रकरण शासन स्तरावर पाठविण्यात येणार असल्याचे सांगितले आहे, तसेच ज्या खोकी धारका यांचे सध्य स्थितीत खोके जागेवर नाही अश्या खोकी धारकांना वारंवार आपली माहिती प्रशासनास देण्या बाबत जाहीर नोटीस देऊन ही माहिती दिली नाही. अशा खोकी धारकांना पुन्हा सूचना देण्यात येत आहे की २००७-८ या कालावधीत आपले खोके काढले आहे , जागे वर नाही अश्या खोकी धारकांनी आपले कागदपत्रे उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. जे कोणी देणार नाहीत त्याच्या खोक्याच्या नंबर रद्द होऊन त्याचे नुकसान होणार आहे, तसे होऊ नये या करिता सर्व माहिती देणे आवश्यक आहे असे अहवान देखील करण्यात आले आहे.


मा आयुक्त सत्यम गांधी यांनी सर्व मागण्या बाबत सकारात्मक धोरण घेणार आहे, तथापी खोकी धारकांनी आपली थकबाकी वेळेत भरून प्रशासनास सहकार्य करावे. नियोजनबद्ध खोकी पुर्वसन करण्यात येणार आहे. संघटना आणि नव्याने गठित होणारी समितीच्या माध्यमातून करता येईल.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button