आणीबाणी काळा दिवस…!!

सांगली, ता.२६ : २५ जून १९७५ भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील काळा अध्याय आजच्या दिवशी काँग्रेसने देशांवर आणीबाणी लादून संविधानाची हत्या केली होती. कोणतेही गुन्हे नसताना हजारो लोकांना तरंगत थांबले गेले पत्रकारांचे तोंड बंद करण्यात आले आणि नागरिकांचे मूलभूत हक्क हिरावून घेण्यात आले. या दुःखद याचे स्मरण ठेवण्यासाठी आणि लोकशाहीच्या संरक्षणासाठी लढा देणाऱ्या सांगलीतील सर्व स्वातंत्र्य सेनानींचे बुधवारी आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये सत्कार करून त्यांचे आभार मानण्यात आले.
यावेळी भाजपा राष्ट्रीय परिषद सदस्य प्रकाश बिरजे, ज्येष्ठ नेते श्रीकांत शिंदे, भाजपा महिला मोर्चा प्रदेश सरचिटणीस स्वातीताई शिंदे , प्रदेश कार्यकारणी सदस्य अविनाश मोहिते,जिल्हा सरचिटणीस विश्वजीत पाटील, मोहन वाटवे, गीताताई पवार, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष गीतांजलीताई ढोपे- पाटील, जिल्हा उपाध्यक्ष हेमलता ताई मोरे, तसेच सर्व भाजपा पदाधिकारी, स्वातंत्र्य सेनानी परिवारासह उपस्थित होते.