
बुधगाव, ता.२५ : बुधगाव ज्योतिबानगर वार्ड क्र :२ मध्ये आज आमदार सुधीरदादा यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या निधीतून पूर्ण झालेल्या काँक्रीट रस्त्याचे उद्घाटन आमदार सुधीरदादा यांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये ज्योतिबानगर वार्ड क्र.२ येथे कॉक्रीट रस्त्यासाठी अकरा लाखांचा निधी मंजूर करण्यात आला. २०१६ पासून आज अखेर पर्यंत श्रीकांत यमगर यांनी जोतिबा नगर येथील रस्त्या साठी वेळोवेळी पाठपुरावा करत आले पण आज त्या कामाला यश मिळाले. यावेळी श्रीकांत यमगर म्हणाले की, आमदार सुधीरदादा यांनी मला रस्त्याचे काम पूर्ण झाल्यावर रस्त्याचे उद्धटन करणार असे सांगितले होते. तर आज त्यांनी काम पूर्ण झाल्यावरच उद्धटन केले.

यावेळी आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधगांवचे सरपंच सौ. वैशाली पाटील, सदस्या शुभांगी कोळी, शिवसेनेचे बजरंग भाऊ पाटील, बाळासाहेब पाटील, माजी उपसभापती विक्रम भाऊ पाटील यांच्या उपस्थितीत सोहळा पार पडला. या कार्यक्रमावेळी आभार व सत्कार शिवसेना ओबीसी व्हीजेएनटी सेना सांगली जिल्हा उप प्रमुख श्रीकांत यमगर यांनी केले. यावेळी भाजपचे बुधगांव गावचे सर्व पदाधिकारी, गावातील शिवसैनिक आणि नागरिक उपस्थिती होते.