

मिरज, ता.२४ : मिरज ते निलजी बामणी रोड हायवे ब्रीजचे येथे प्रतिबंधीत असणारी सुगंधी तंबाखूची वाहतूक व विक्री करणाऱ्यांवर छापा टाकून दोघांना ताब्यात घेतले. सदर कारवाई महात्मा गांधी पोलिसांनी केली व त्यांच्याकडून ५७० किलो प्रतिबंधित सुगंधी तंबाखू व एक आयशर टेम्पो असा एकूण ११ लाख २ हजार ६०० रुपये किंमतीच्या मुद्देमाल जप्त केला. याबाबत राजकुमार निगाप्पा बुदीहाळ, वय ३०, रा. यड्राव फाटा, रेणूकानगर, यड्राव, जि. कोल्हापूर, हारुण शौकत हुक्कीरे, वय ४४, रा. राजवाडा चौक, जामा मस्जीदजवळ, इचलकरंजी, जि. कोल्हापूर, रिहानमलीक मुबारक मुल्ला, वय २४, रा. शहापूर, दत्तनगर, इचलकरंजी, जि. कोल्हापूर या ३ जणांवर महात्मा गांधी पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जप्त करण्यात आलेल्या मुद्देमाल
- १,०२,६०० रु. की. प्रतिबंधित ५७० किलो सुगंधी तंबाखू
- १०,००,००० रु. कीं. चारचाकी आयशर गाडी क्र. MH 15 FV 1108 असा हा एकूण ११ लाख २ हजार ६०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिसांची अधिक माहिती अशी की, नशाखोरी तसेच अंमली व नशायुक्त पदार्थ तसेच गुटखा विक्री रोखण्याचे अनुषंगाने महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे सपोनि संदीप शिंदे व त्यांचे एक पथक पेट्रोलिंग करत असताना त्यांना गोपनीय बतमीदारांकडून बातमी मिळाली की, मिरज ते निलजी बामणी रोडवरील हायवे ब्रीजचे खाली, मिरज येथे एक आयशर ट्रक एमएच-१५-एफव्ही-११०८ हा संशयीरीत्या उभा असून सदरचे ट्रकमधून दोन इसम काहीतरी संशयीत मुद्देमाल गाडीतून खाली उतरवीत आहेत. अशी खात्रीलायक बातमी मिळाली. मिळालेल्या बातमीप्रमाणे नमूद ठिकाणी सापळा रचून थांबले असता
दोन संशयीत इसम सदरचे ट्रकमधून काहीतरी संशयीत मुद्देमाल गाडीतून खाली उतरवीत असताना दिसून आले. त्यांचा संशय आल्याने नमूद पोलीस पथकाने ने संशयितांना ट्रकमधील साहीत्याबाबत विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिले. सदर माल पथकाला सापडू नये यासाठी आयशरमध्ये लिंबू तसेच इतर शेतीमाल याच्या दोनशे पोती साहीत्याच्या खाली महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेल्या सुगंधी तंबाखूचा साठा लपवून लिंबू तसेच शेतीमाल साहीत्याची वाहतूक करीत असल्याचा बनाव केला. पोलिसांनी राजकुमार निंगाप्पा बुदीहाळ, हारुण शौकत हुक्कीरे यांना ताब्यात घेवून त्यांचेकडून महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेल्या सुगंधी तंबाखूचा साठा व वाहतूक करण्यासाठी वापरलेला ट्रक असा एकूण ११,०२,६००/- रु. चा मुद्देमाल जप्त केला. सदर आरोपींना अधिक विश्वासात घेवून त्यांचेकडे कौशल्यापुर्ण तपास केला असता, त्यांनी सदरचा सुगंधी तंबाखूचा साठा संशयित रिहानमलीक मुबारक मुल्ला याचे सांगणेवरुन कर्नाटक राज्यातून आणला असून तो मिरज व इचलकरंजी परीसरातील पानपट्टीधारकांना चढ्या दराने किरकोळ स्वरुपात विक्री करुन वितरण करीत असल्याचे निष्पन्न झाले. संशयीत रिहानमलीक मुल्लाला इचलकरंजीतुन ताब्यात घेवून गुन्हा दाखल केला. प्रतिबंधीत केलेल्या सुगंधी तंबाखू व गुटखा यांची विक्री, वितरण व्यवस्थेचे कर्नाटक इचलकरंजी कनेक्शन समोर आले असून त्याअनुषंगाने सदर गुन्हयाचा पुढील तपास मा. वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे कडील पोलीस पथक करीत आहे.
