
कुपवाड , ता.२३ : भाजप कामगार आघाडी सांगली शहर जिल्हाध्यक्ष पैलवान सुभाष बाळू गडदे (वय ५० रा. अहिल्यानगर, कुपवाड ता.मिरज) यांचे सोमवारी (ता.२३) पहाटे निधन झाले. आमदार सुधीर गाडगीळ यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख होती. कुस्ती क्षेत्रातील एक नावाजलेले व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांचा छाप होता. पैलवानांना कुस्ती क्षेत्रात वाव मिळावी व नवीन पैलवान कुस्तीकडे आकर्षित व्हावे यासाठी ते अहिल्यानगर येथे कुस्तीचे मैदाने भरवायचे. कुपवाड, मिरज औद्योगिक क्षेत्रातील विविध कारखान्यांना सुरक्षा रक्षक पुरविणे त्यांचा व्यवसाय होता. कर्तृत्ववाच्या जोरावर राजकीय, सामाजिक क्षेत्रात त्यांनी दबदबा निर्माण केला.
आयईएस अधिकारी आकाश मायाप्पा गडदे (दिल्ली) यांचे ते चुलते होत.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ, भाऊजये, पुतण्या, पुतणी, नातवंडे असा मोठा परिवार आहे. रक्षाविसर्जन मंगळवार (ता.२४) सकाळी ९ वाजता सांगली अमरधाम येथे होणार आहे.