सांगलीत धक्कादायक प्रकार !

डॉक्टर होण्याचे साधनाचे स्वप्न भंगले. नीटच्या सराव परीक्षेत गुण कमी पडले म्हणून मुलीच्या पित्याने मुलीला केली बेदम मारहाण; मारहाणीत मुलीचा मृत्यू .
नेलकरंजी, ता.२३ : सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी गावात एक धक्कादायक प्रकार घडला. मुख्याध्यकपिताने आपला मुलीला नीटच्या सराव परीक्षेत कमी गुण मिळाले म्हणून एका लाकडी खुंट्याने बेदम मारहाण केली. या मारहाणीत मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. साधना भोसले (वय २०) असे मयत मुलीचे नाव आहे. बेदम मारहाण करणाऱ्या पित्याचे नाव धोंडीराम भोसले असून तो एका खाजगी शिक्षण संस्थेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत. याबाबत पत्नी प्रीती भोसले यांनी पोलिसात फिर्याद दिली असून त्या फिर्यादीवरून पिता धोंडीरामाला अटक करण्यात आले आहे.
अधिक माहिती अशी की, साधना ही हुशार विद्यार्थीनी होती. दहावीत तिला ९५ टक्के गुण मिळाले होते. डॉक्टर बनण्याचे तिचे स्वप्न होते. नीटच्या सराव चाचणी परीक्षेत साधनाला कमी गुण मिळाले याचा राग धरुन संतप्त झालेल्या पित्याने साधनाला लाकडी खुंट्याने मारहाण केली. मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या साधनाला रुग्णालयात दाखल न करता दुसऱ्या दिवशी योगदिनासाठी पिता धोंडीराम शाळेत गेला. शाळेतून घरी आल्यानंतर साधना बेशुद्ध अवस्थेत आढळली. तिला रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत या घटनेचे दुर्दैव असे की एका मुलीचा आईलाच पित्याचा विरोधात पोलिसात फिर्याद द्यावी लागली. आईच्या फिर्यादीवरून पित्याला अटक करण्यात आले आहे. या पुढील अधिक तपास पोलीस करत आहे.