
बुधगाव, ता.२० : शिवसेना ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण करणारा एकमेव पक्ष आहे. शिवसेना पक्षाच्या ५९ वा वर्धापनदिनानिमित्त व शिवसेना मिरज तालुका संघटक विनोद ठोंबरे यांच्या वाढदिवसानिमित्त सांगली जिल्हा ओबीसी, व्हीजेएनटी सेनेचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब किसवे, जिल्हाप्रमुख विक्रम चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली बुधगाव येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक २ मधील विद्यार्थ्यांना वही आणि खाऊचे वाटप करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे बजरंग भाऊ पाटील, नानासाहेब शिंदे, विजय माळी, श्रीकांत यमगर, विनोद ठोंबरे, शाळेचे सर्व शिक्षक, विद्यार्थी आदी उपस्थित होते.
