
वाहनधारकांना आता थोडासा दिलासा मिळाला आहे. (HSRP) नंबरप्लेट बसवण्यासाठी आता तिसऱ्यांदा मुदतवाढ करण्यात आली आहे. राज्यात आतापर्यंत ३० टक्के वाहनधारकांनीच नोंदणी पाटी बसवून घेतली आहे. राज्यात मार्च २०१९ पूर्वीच्या जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी पाटी (HSRP) बसवणं बंधनकारक केले आहे. यासाठी राज्यातील वाहनधारकांची तारांबळ होत आहे. पण, पाट्यांची कमतरता असल्यामुळे नोंदणीमध्ये अडचणी येत आहेत. यासाठी १५ ऑगस्ट २०२५ पर्यंत मुदतवाढ करण्यात आली आहे. तर ही मुदतवाढ शेवटची असल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे. या मुदतीमध्ये नोंदणी केली नाहीतर वाहनधारकांवर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा दिला आहे.