
सोलापूर, ता. १९ : स्वामी समर्थांच्या भूमीत लँड जिहादचा कट ? पायवाट मागणं म्हणजेच अतिक्रमण, घुसखोरी आणि महिलांच्या सुरक्षेला धोका ! या सर्व विषयासंदर्भात अक्कलकोट येथे सकल हिंदू समाज यांच्यावतीने भव्य हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोर्चात अशा इशारा देण्यात आला की हिंदू धर्मावर गदा आणणाऱ्यांना आता माफी नाही, उत्तर केवळ ‘जशास तसं’च नाही, तर अधिक जोरात दिलं जाईल!

छोट्या-छोट्या आमिषांच्या माध्यमातून, गरिबीचा गैरफायदा घेत, भावनिक फसवणूक करून जे धर्मपरिवर्तनाचं षड्यंत्र रचत आहेत, त्यांना आज हिंदू समाज एकजूटीनं सांगतोय “बस झालं, सहनशीलतेचा अंत झाला., आता सुरू होईल निर्णायक प्रतिकार!”

हिंदूंची सहनशक्ती ही कमजोरी नाही, ती आमची मर्यादा होती पण आता ही मर्यादा संपली आहे. धर्मांतराच्या प्रत्येक घटनेला उत्तर दिलं जाईल, प्रत्युत्तर दिलं जाईल, आणि ज्या समाजविघातक शक्ती या आगीशी खेळत आहेत, त्यांना हिंदू समाजाची अस्मिता काय असते हे दाखवून दिलं जाईल. हा लढा धर्माचा आहे, संस्कृतीचा आहे, अस्तित्वाचा आहे आणि आता तो थांबणार नाही!

यावेळी आमदार गोपीचंद पडळकर, आमदार संग्राम भैय्या जगताप, आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी, आमदार देवेंद्र कोठे तसेच सर्व सकल हिंदू समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.