
सोलापूर , ता.१८ : अकलूज सयाजीराजे वॉटर पार्कमध्ये दुर्घटना, झोका कोसळल्याने व्यावसायिक तुषार धुमाळ (भिगवण) यांचा मृत्यू झाला व दोघे जखमी झाले आहेत. हा अपघात झोका चालू असताना तांत्रिक बिघाड आल्याने झाला. या दुर्घटनेत झोक्यावर बसलेले पर्यटक खाली पडले. खाली पडल्याने धुमाळ यांचा जागीच मृत्यू झाला. याशिवाय दोन इतर व्यक्ती किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे. तर हे वाटरपार्क माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे भाऊ जयसिंहराव मोहिते पाटील यांच्या मालकीचे असल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस आहे.