
सांगली, ता.१८: कुपवाड यशवंतनगरमध्ये काही दिवसांपूर्वी ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी दबाव व शारीरक छळाने आत्महत्यास प्रवृत्त झालेल्या सात महिन्यांच्या गर्भवती विवाहित ऋतुजा राजगे नी आत्महत्या केली, घटना संपूर्ण हिंदू समाजाच्या अंतरात्म्याला हादरवणारी आहे. या अमानुष घटनेच्या निषेधार्थ मंगळवारी १७ जून रोजी सांगली शहरात सकल हिंदू समाजाच्या वतीने “शक्ती ऋतुजा” या नावाने भव्य मशाल मोर्चा काढण्यात आला.

या मोर्चात सहभागी झालेल्या हजारो हिंदू बांधवांनी एकमुखाने धर्मांतरविरोधी कायदा तात्काळ लागू करा अशी जोरदार मागणी केली. या घटनेने सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरानंतर धर्मांतर विरोधी कायदा तातडीने आमला आणावा, अशी लोकांकडून केली जात आहे. ऋतुजाच्या आत्महत्यनेनंतर आमदार गोपीचंद पडळकर यांनीही आक्रमक भूमिका घेतली आहे. धर्मांतरासाठी कोणी आलं तर ठोकून काढा, असं भाष्य आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलं आहे. ‘धर्मांतरण करण्यासाठी गावागावात येणाऱ्यांना यापुढे ठोकून काढा. ठोकणाऱ्यांना यापुढे बैलगाडी शर्यतीप्रमाणे दोन लाख, तीन लाख, पाच लाख रुपये आणि सैराट करणाऱ्यांना अकरा लाखाचं बक्षीस द्या, असं पडळकर म्हणाले.
या वेळी समाजाला संबोधित करताना स्पष्ट शब्दांत सांगितले की, “हिंदू धर्मावर होणारे कुठलेही आक्रमण आता सहन केले जाणार नाही. विशेषतः धर्मांतरासाठी हिंदू मुलींवर होणारे अत्याचार खपवून घेतले जाणार नाहीत. हा मशाल मोर्चा केवळ निषेध व्यक्त करण्यापुरता मर्यादित नव्हता, तर हा हिंदू समाजाच्या स्वाभिमानाचा आवाज होता. आता वेळ आली आहे की शासनाने तातडीने धर्मांतरविरोधी कायदा लागू करून अशा घटना थांबवाव्यात, अन्यथा जनआंदोलन उग्र रूप धारण करेल.