
कुपवाड , ता.१५ : सालाबादप्रमाणे ३० जून ते ५ जुलै एकूण सहा दिवसांच्या कालावधीत कुपवाड ते पंढरपूर पायी दिंडीचे संयोजन करण्यात आले आहे. दिंडीचे यंदाचे चौदावे वर्ष आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही उत्साहात व काटेकोरपणे पार पडावे. यासाठी श्री संत शिरोमणी रोहिदास महाराज दिंडी सोहळा, कुपवाड यांच्या वतीने आज रविवार (ता.१५) श्री. महादेव मंदिरात मुख्य संयोजक शहाजीराव सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारणी जाहीर करण्यात आली.
यामध्ये संयोजक प्रकाश व्हनकडे, तानाजी व्हनकडे, दिंडी वाहक विलास कांबळे, शशिकांत कित्तुरे, गोपाळ व्हनकडे, विठ्ठल पाटील, कुमार शिंदे, राजेंद्र सुतार, छाया गडदे, पुष्पा शारदा माने, पुष्पा हंकारे, चोपदार बाबासाहेब सुतार आणि आकाश रायमाने, पताका वाहक दिलीप सूर्यवंशी, जयपाल व्हनकडे, हणमंत व्हनकडे, वसंत व्हनकडे, मधुकर पाटील जयराम व्हनकडे, अब्दागिरीचे वाहक भारत चवरे व शंकर बामणे, विणेकरी जनार्दन व्हनकडे, वाहनाचे वाहक अमित कांबळे, भजनी मंडळात हणमंत व्हनकडे, भिवा व्हनकडे, विलास कांबळे, गोपाळ व्हणकडे, शशिकांत कित्तुरे, छाया गडदे, गणपती कोळी, नारायण तोडकर, राधाबाई कांबळे विठ्ठल पाटील, संभाजी पाटील, वसंत व्हनकडे अशाप्रकारे सर्वांना जबाबदारी वाटून देण्यात आली.
आषाढी एकादशीनिमित्त सोमवार (ता.३०) रोजी कुपवाड ते पंढरपूर पायी दिंडीची सुरवात सकाळी दहा वाजता श्री.महादेव मंदिरातून होणार आहे. संयोजनाप्रमाणे गावोगावी मुक्काम करत ५ जुलैला ती पंढरपूर येथे पोहचेल. ७ जुलैला ती कुपवाडला पोहचेल. नगर प्रदक्षिणा, सन्मान, सांगता असा एकंदरीत सोहळा होणार आहे.
यासाठी सर्व हरिभक्त नागरिक, माळकरी, बाळगोपाल, अबाल वृद्धांनी आवर्जून सहभागी व्हावे. आवाहन सोहळ्यातर्फे करण्यात आले आहे. दिंडीची सर्व पूर्वतयारी झाली आहे. त्यानुसार कार्यकारणी जाहीर करून आज सर्वानुमते जबाबदारीचे वाटप करण्यात आले.