
सोलापुरात, ता.१५: पुणेतील सराईत गुंड शाहरुख उर्फ अट्टी रहीम शेख, वय २३ वर्ष या गुंडांचा एन्काऊंटर कालमध्य रात्री पोलिसांकडून करण्यात आला. शाहरुखवर पुण्यात अनेक गुन्ह्याची नोंद आहे. सोलापुरात पुणे गुन्हे शाखेचे पथक गुंडास पकडण्यास दाखल झाले होते. लांबोटी येथे घरात लपून बसलेल्या सराईत गुंडास पकडण्यात गेले असता सराईत गुंड शाहरुखने पोलिसांवर गोळीबार केला त्याच्या प्रति हल्ल्यात पोलिसांनी शाहरुखवर गोळीबार केला. झालेल्या गोळीबारात सदर आरोपी गंभीर जखमी झाला. पोलिसांनी त्याला उपचारासाठी सोलापूर शासकीय रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान शाहरुखचा मृत्यू झाला.