
नाशिक, ता.१४ : मराठी लिहिता-वाचता आले तरच नाशिकमध्ये रिक्षाचालकांना परवाना मिळणार आहे. रिक्षाच्या नव्या परवान्यांसाठी गेल्या आठवड्यापासून मराठी भाषेची परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य करण्यात आलंय. परीक्षेसाठी गुणांची कुठलीही अट नाही. फक्त मराठी लिहिता- वाचता येते की नाही याची चाचणी घेतली जात आहे. त्यामुळे आठवडाभरात अनुत्तीर्ण झालेल्या १४५ जणांचे परवाने नाकारण्यात आले आहे. अनेक रिक्षाचालकांना फक्त मराठी बोलता येते, परंतू वाचता येत नसल्याने त्यांची अडचण निर्माण झालीये… रोज पंधरा ते वीस अर्ज अपात्र होतायेत.. दरम्यान, नाशिक आरटीओच्या या नव्या अटीवर रिक्षाचालक संघटनांकडून आक्षेप घेण्यात आला आहे.