
सांगली, ता.१४ : सांगली ते कर्नाळ रोडवरील सुशांत गार्डन मंगल कार्यालयात गर्दीचा फायदा घेत चोरी करणाऱ्या संशयित आरोपी फिरासत फकरुद्दीन शेख, वय २२ वर्षे, व्यवसाय मजुरी, रा. बदाम चौक, सांगली, ता. मिरज याला सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केले.
संशयित आरोपी फिरासत याच्या कब्जातील जप्त करण्यात आलेल्या मुद्देमाल
८८,०००/- रु १० ग्रॅम वजनाचे एक सोन्याचे वेढण, ४४,०००/- रु ५ ग्रॅम वजनाचे एक सोन्याची पिळाची अंगठी, ६१,०००/- रु ७ ग्रॅम वजनाची सोन्याचे एक लॉकेट, ८८,०००/- रू १० ग्रॅम वजनावी एक सोन्याची गोफ चैन, १,३२,०००/- रु १५ ग्रॅम वजनाचे एक सोन्याचे गंठन काळे मणी, ८८,०००/- रु १० ग्रॅम वजनाचे एक सोन्याच्या बिदल्या, ५०००/- रु ५० भार एकुण वजनाच्या चांदीच्या ६ जोड बिंदल्या, लहान पैजन १ जोड, १ जोड जोडवी असा एकूण पाचलाख सहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याबाबत संजयनगर पोलिसात बुधवार (ता.४) रोजी तक्रार दाखल करण्यात आली होती. याची फिर्याद सौ.अंजली ज्ञानेश्वर कोल्ले, रा. भोरे वस्ती, भोसरे, ता. माझ, जि. सोलापूर यांनी दिली.
पोलिसांची अधिक माहिती अशी की, मा. पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस मालमत्ते विरुध्दचे गुन्हे उघडकीस आणून कारवाई करण्याचे आदेशीत केले. दिलेल्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि/ सतिश शिंदे व त्यांचाकडील सहा. पोलीस निरीक्षक पंकज पवार व स्टाफ यांचे एक पथक तयार करण्यात आले. पथकामधील पोलीस अनिल कोळेकर, दऱ्याप्पा बंडगर व विक्रम खोत यांना बातमीदाराकडून बातमी मिळाली की, फिरासत फकरुद्दीन शेख, या संशयिताने सुशांत गार्डन मंगल कार्यालयात लग्नात चोरी केली आहे. संशयित आरोपीला तपास कामी ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याने त्याचे नाव फिरासत फकरुद्दीन शेख असे सांगून दहा दिवसापुर्वी सांगली ते कर्नाळ रोडवरील सुशांत गार्डन मंगल कार्यालयात लग्न समारंभ सुरु असताना गर्दीचा फायदा घेत कार्यालयातील रुम मध्ये एका बॅगेत ठेवलेले सोन्याचे दागिने चोरल्याचे कबूल केले व त्याच्या खिशात रूमालमध्ये दागिने बांधुन ठेवल्याचे सांगितले. सदर दागिने जप्त करून दागिने वरील गुन्हयातीलच असल्याची खात्री करून घेतली. सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपास कामी संजयनगर पोलीस ठाणेकडे वर्ग करण्यात आले.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि/ सतीश शिंदे, सपोनि/ पंकज पवार, अनिल कोळेकर, अमर नरळे, सतिश माने, नागेश खरात, दऱ्याप्पा बंडगर, सागर लवटे, संदीप गुरव, महादेव नागणे, सागर टिंगरे, मच्छिंद्र बर्डे, उदयसिंह माळी, संदिप नलावडे, विक्रम खोत, केरूबा चव्हाण, सायबर पोलीस ठाणेकडील अभिजित पाटील आदींनी केली. या पुढील अधिक तपास संजयनगर पोलीस करीत आहेत.