
मिरज, ता१४: तालुक्यातील बेडग येथे चोरट्यांनी फिल्मी स्टाईलने केली चोरी. गाडीचा पाठलाग करत गाडी आडवून कोयताचा धाक दाखवत कोयत्याने गाडीच्या काच्या फोडून चोरट्यांनी सात लाख रुपये केले लंपास. बेडग-मंगसुळी रोड पाटील वस्ती नजीक चारचाकी पिकअप गाडी क्रमांक MH १२ ७८४८ ही गाडी पुणेहून विजापूरला जात असता बेडग येथे दोन चारचाकी गाड्यांनी पाठलाग करून सात लाख रुपये लुटले. घटनास्थळी मिरज ग्रामीण पोलीस दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे. गस्तीस असलेले पोलीस उपनिरीक्षक सुनील पाटील व हवालदार सचिन जाधव उपस्थिती होते.