
ता.१४: शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू गेल्या सहा दिवसांपासून अन्नत्याग आंदोलनावर होते. त्यांची प्रकृती खालावत असताना, राज्य सरकारकडून यावर सकारात्मक पावले उचलली जात आहेत.
आज अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपोषण स्थळी भेट दिली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी थेट फोनवरुन संपर्क साधला आणि फोनवर बच्चू कडू यांच्याशी मुख्यमंत्री स्वतः संवाद साधला.
🔹 मुख्यमंत्री फडणवीस यांची महत्त्वाची घोषणा:
- कर्जमाफीसाठी तातडीने उच्चस्तरीय समिती स्थापन केली जाईल.
- बच्चू कडू यांना त्या समितीत समाविष्ट केले जाईल.
- शेतकऱ्यांच्या कर्जाचा डेटा गोळा करून समिती अहवाल देईल.
- त्या अहवालानंतर कर्जमाफीचा निर्णय घेतला जाईल.
बावनकुळे यांच्याकडून दिलेली माहिती
बच्चू कडू यांच्या 17 मागण्यांवर बैठक घेण्यात येईल. या बैठकीस सर्व संबंधित विभागांचे मंत्री हजर राहतील. दिव्यांग अनुदानाच्या मागणीसाठी ते अधिवेशनात मांडले जाईल. नवीन कर्ज वितरणाबाबत कॅबिनेटमध्ये चर्चा करून निर्णय घेण्यात येईल.
🔸 शेतकऱ्यांचा स्पष्ट विरोध:
मुख्यमंत्र्यांची प्रस्तावित समिती आणि टप्प्याटप्प्याने कर्जमाफी करण्याच्या भूमिकेला शेतकऱ्यांनी विरोध केला. त्यांनी स्पष्ट शब्दांत “सरसकट कर्जमाफी हवी” अशी भूमिका मांडली. बच्चू कडू यांनी देखील स्पष्ट केलं आहे की: “ही केवळ घोषणा आहे, ठोस निर्णय नाही. त्यामुळे मी उपोषण मागे घेणार नाही.”