
सांगली, ता १३ : महापालिका आयुक्त सत्यम गांधी यांनी आज अचानक पणे महापालिका मुख्यालयासहित अन्य कार्यालयांना भेटी दिल्या. कर्मचाऱ्यांची उपस्थिती व कर्मचाऱ्यांनी सकाळपासून काय काम केलं याबाबतची माहिती घेतली. प्रत्येक कार्यालयात जाऊन कर्मचारी आहेत का? त्यांनी आतापर्यंत काय काम केलं हे जाणून घेतलं. अनेक कार्यालयातील कर्मचारी अनुपस्थितीत होते त्यांची माहिती आणि अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.

कर्मचाऱ्यांना कार्यालयीन शिस्त लागावी, कामकाजात गतिमानता यावी आणि कर्तव्यात कोणी कसूर करू नये या उद्देशाने अचानक भेट देऊन विविध कार्यालयांचा आढावाआयुक्त सत्यम गांधी यांनी घेतला. इथून पुढे या भेटी सातत्याने अचानकपणे ठेवल्या जातील. महापालिका कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत हजर राहावे. जर कामानिमित्त बाहेर जाणार असाल तर त्याबाबतचे हालचाल रजिस्टरमध्ये नोंद करून बाहेर जाणे आवश्यक आहे. याचबरोबर कर्मचाऱ्यांनी कामावर असताना ओळखपत्र घालणं बंधनकारक आहे. तसेच कार्यालयात येणाऱ्या नागरिकांची सौजन्याने वागणे, बोलणे आणि त्यांच्या कामांना प्राधान्य देणे या बाबी अधिकारी कर्मचारी यांनी प्राधान्यांना पाळाव्यात. जे अधिकारी कर्मचारी कर्तव्यात कसूर करतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा। आयुक्त सत्यम गांधी यांनी दिला.

यावेळी त्यांच्या समवेत मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. रवींद्र ताटे, स्वच्छता अधिकारी अतुल आठवले आदी उपस्थित होते.