
सांगली, ता.१३ : कुपवाड यशवंतनगर येथे सात महिन्यांची गर्भवती ऋतुजा राजगे हिला धर्मांतरासाठी दबाव व शारीरिक छळ करून आत्महत्येस प्रवृत् केले. ही अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी आमदार मा. चित्राताई वाघ यांनी सांगली पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांची भेट घेऊन दोषींवर तात्काळ कारवाई करत अटकेची मागणी केली. ऋतुजाच्या छळात सहभागी असलेल्या सासरच्या मंडळींबरोबरच लग्न ठरवण्यासाठी मध्यस्थी करणारा नायब तहसीलदार कोळी, संबंधित फादरवरही कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच या प्रकरणाचा जलदगतीने खटला चालवावा, अशी मागणी केली.

यावेळी आमदार चित्राताई वाघ, आमदार गोपीचंद पडळकर, भाजपच्या स्वाती शिंदे आदी उपस्थित होते.