
सांगली, ता. १३ : सांगली स्टेशन चौकात बच्चूकडू यांच्या समर्थनात अर्धनग्न अवस्थेत गाजर वाटप आंदोलन करण्यात आले. बच्चूकडू हे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी अन्नत्याग आंदोलनास बसले आहेत. या आंदोलनाची दखल सरकारने न घेतल्याने राज्य सरकारच्या निषेधार्थ सांगली स्टेशन चौकात आज प्रहारचे सांगलीतील पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याकडून आंदोलन करण्यात आले.
मुख्यमंत्री साहेब गाजर घ्या… एकनाथ शिंदे साहेब गाजर घ्या… अजित पवार साहेब गाजर घ्या…. कृषिमंत्री साहेब गाजर घ्या…… अशा जोरदार घोषणा सरकारच्या विरोधात आंदोलकांडून देण्यात आल्या. आंदोलकांनी गाजर वाटप करून सरकारचा निषेध केला. शेतकरी अपंग विधवा अशा एकूण १७ मागण्यांसाठी भाऊंच्या पोटामध्ये गेली पाच दिवस झालं अन्नाचा कण गेला नाही. गेंड्याच्या कातडीच्या सरकारला आमचं एवढेच सांगणं आहे. गड आला पण सिंह गेला” याची पुनरावृत्ती प्रहारचे कार्यकर्ते होऊ देणार नाही. आमच्या नेत्यांच्या जीवितास काही बरे-वाईट झालं तर महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही असे पडखड शब्दात यावेळी बोलण्यात आले. अति अतिरेक कराल तर…शेतकऱ्यांच्या संयम तुटू शकतो. यावेळी युवक जिल्हाध्यक्ष ओम भोसले, मिरज तालुका उपाध्यक्ष राजू कदम, खानापूर तालुका अध्यक्ष आकाश शिंदे, शिवराज पाटील, तालुकाप्रमुख आदींची या आंदोलनास उपस्थिती होती.