
सांगली. ता.१३: कुपवाड यशवंतनगर रोड, राजगुरूनगर येथे गौरी ऊर्फ ऋतुजा सुकुमार राजगे वय २९ वर्ष हिला सासरच्या लोकांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारणासाठी सातत्याने शारीरिक व मानसिक छळ केल्याने सात महिन्याची गर्भवती ऋतुजा ने आत्महत्या केली. या घटनेच्या तीव्र निषेध आमदार गोपीचंद यांनी केला. मिरज तालुक्यातील गुंडेवाडी येथे ऋतुजाच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना धीर दिला व त्यांच्या न्यायासाठी खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभा राहणार असल्याचे सांगितले.
गोपीचंद पडळकर म्हणाले ऋतुजाला धर्मांतराच्या नावाखाली तिला मारहाण, दमबाजी, अपमान आणि अमानुष वागणूक देणाऱ्या सासरच्यांचा निर्दय चेहरा समोर आला आहे. यात एका अजाण निष्पाप जीव जन्माच्या आधीच गर्भात संपवण्यात आला आहे. त्याच्या आईच्या वेदनांचा भयानक अंत झाला आहे. हे हिंदू समाजाला हादरवून टाकणारे वास्तव समोर आले आहे. ही घटना संतापजनक असून या घटनेचा तीव्र शब्दात निषेध आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. या घटनेबाबत सरकारकडे स्पष्ट मागणी करणार असल्याचे सांगितले.
गोपीचंद पडळकर आक्रमक
या प्रकरणातील सर्व दोषींना, सासरच्यांना आणि धर्मांतरामागे सक्रिय असलेल्या फादरला कठोरातील कठोर शिक्षा झालीच पाहिजे. यासोबतच राज्यात तात्काळ ‘धर्मांतरण बंदी कायदा’ आणि ‘लव्ह जिहाद विरोधी कायदा’ लागू करण्यात यावा, अशी आमची ठाम मागणी केली आहे. महिलांवर धर्मांतराच्या नावाने होणारे छळ, फसवणूक आणि अत्याचार थांबवण्यासाठी कायदेशीर संरक्षण आवश्यक आहे. या दुर्दैवी घटनेविरोधात सांगलीत मूक मोर्चा काढण्यात येणार असून, संपूर्ण समाजाने एकत्र येऊन या विकृतीविरोधात आवाज उठवला पाहिजे आणि धर्मांतराची ही नांगी तिथेच ठेचून टाकली पाहिजे. पीडित ऋतुजा राजगे यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना धीर दिला असून, त्यांच्या न्यायासाठी मी खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभा आहे.