
सांगली, ता. १२: राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील सांगली दौऱ्यावर आले असताना बुधवार (ता.११) त्यांच्या अध्यक्षतेखाली सांगली जिल्ह्यातील जलसंपदा प्रकल्पांची सद्यस्थिती, पूर व्यवस्थापन आणि म्हैसाळ योजनेच्या सुधारित कामांसाठी महत्वपूर्ण आढावा घेण्यात आली. या बैठकीत सुधारित म्हैसाळ योजनेअंतर्गत पाईप दुरुस्ती, नवीन उच्च क्षमतेचे पंप बसवणे आणि सुधारित म्हैसाळ योजनेसाठी तब्बल ₹६०० कोटींच्या निधीची घोषणा करण्यात आली.
हा निर्णय जत तालुक्यासाठी पाणीपुरवठा आणि शेतीसाठी मैलाचा दगड ठरेल. याचवेळी आटपाडी तालुक्यातील राजेवाडी तलावालगत जलसंपदा विभागाची जमीन आहे, त्या जमिनीचा विकास आराखडा तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या व भविष्यातील पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. ज्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल आणि रोजगाराच्या संधीही निर्माण होतील.