
सांगली, ता. १२: सांगली मिरज कुपवाड मनपा आयुक्त सत्यम गांधी ॲक्शन मोडवर. कुपवाडचा मानधनावरील अभियंता आजम जमादारला सेवामुक्त करण्यात आले. नागरिकांचे काम करण्यास टाळाटाळ करणे, कामासाठी पैशाची मागणी करणे, लोकांची कामे प्रलंबीत ठेवत असल्याने मनपा आयुक्त सत्यम गांधी यांनी ही धडक कारवाई केली आहे.

एकीकडे उपायुक्त वैभव साबळे यांनी सात लाख लाचेची मागणी केल्याने लाचलूचपत प्रतिबंधक विभागने बेड्या ठोकल्या असताना दुसरीकडे मनपा आयुक्त सत्यम गांधी थेट कारवाई करत अभियंता आजम जमादार याला केले सेवा मुक्त. कुपवाड येथील विभागीय कार्यालयात आयुक्त यांनी सोमवारी अचानक भेट दिली. अल आजम सलीम जमादार, स्थापत्य अभियंता हा कार्यालयात उपस्थित नव्हता.कार्यालयामध्ये नागरिकांची मोठी गर्दी दिसून आल्याने आयुक्तांनी नागरिकांना विचारणा केली. नगररचना कार्यालयात वारंवार ये जा करून ही कामे होत नाहीत. लोकांची फाईल प्रलंबित ठेवणे आणि लोकांकडून नगररचना विभागाकडील प्रस्तावास मान्यता देण्याच्या बदल्यात पैसे मागणे ह्या सर्व बाबीची आयुक्तांनी शहानिशा केली. यावर ॲक्शन घेत आयुक्त गांधी यांनी अभियंता आजम जमादारला केले सेवामुक्त . मकानदार नंतर दुसरा मानधन अभियंता सेवामुक्त करण्यात आले आहे.