
सांगली, ता. ११: कुपवाड सावळीत उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सांगली, अंतर्गत ड्रायव्हिंग टेस्ट व वाहन नोंदणी सावळीच्या कार्यालयात मंगळवार (ता.१०) रोजी दुपारी चारच्या सुमारास जाऊन मोटार वाहन सहा. निरीक्षका स्नेहल कदम यांना संशयित आरोपी अनिकेत वनकडे याने धक्काबुक्की करून हातातील शासकीय कागदपत्रे हिसकावून घेऊन फेकून दिली व टेबलावरचे कागदपत्रे विस्कटून तुमचे काय चालले आहे असे म्हणत तुम्ही येथे कसे काम करता अशी धमकी देऊन शासकीय कामात अडथळा आणल्याने संशयित आरोपी अनिकेत वनकडे पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही याच्या विरुद्ध कुपवाड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. याची फिर्याद स्नेहल सर्जेराव कदम, वय ३२ वर्षे, रा.कलानगर सांगली. मूळ राहणार – हरळी बुद्रुक, तालुका गडहिंग्लज, जिल्हा कोल्हापूर यांनी दिली. या पुढील अधिक तपास कुपवाड पोलीस करीत आहे.