

कुपवाड, ता. ११: कुऱ्हाडीने डोक्यात घाव घालून पत्नीने केला पतीचा निर्घृण खून. ही घटना मंगळवार (ता. १०) रोजी रात्रीच्या दरम्यान प्रकाश नगर, गल्ली क्रमांक ०६ अहिल्यानगर, कुपवाड येथे घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली. अनिल तानाजी लोखंडे ( वय ५३ वर्षे रा. प्रकाश नगर, गल्ली क्रमांक ०६ अहिल्यानगर, कुपवाड) असे खून झालेल्या पतीचे नाव आहे. याबाबत मुकेश मोहन लोखंडे यांनी कुपवाड पोलिसात फिर्याद दिली असून मयत अनिल लोखंडे हे मुकेशचे चुलते होते. कुपवाड पोलिसांनी पत्नी राधिका बाळकृष्ण इंगळे, वय २७ वर्षे राहणार वडी, तालुका – खटाव, जिल्हा – सातारा. सध्या राहणार प्रकाश नगर गल्ली क्रमांक ०६ अहिल्यानगर, कुपवाड हिच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पती अनिल व पत्नी राधिका या दोघांचाही पुनर्विवाह पंधरा दिवसापूर्वी ता.२३ मे २०२५ रोजी झाला होता.

पोलिसांच्या मिळालेल्या माहितीनुसार अनिल तानाजी लोखंडे रा. प्रकाशनगर, गल्ली क्रमांक ०६ अहिल्यानगर, कुपवाड त्यांचे घरामधील हॉलमध्ये झोपले असताना लोखंडे यांची पत्नी राधिका बाळकृष्ण इंगळे यांनी पती अनिलच्या डोक्यात व कानावर कुऱ्हाडीने घाव घालून निर्घृण खून केला. या घटनेची कुपवाड पोलीसात नोंद झाली आहे. खुनाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून अधिक तपास सहा. पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली कुपवाड पोलीस करत आहे.