
तासगाव, ता.९: तालुक्यातील पोलीस प्रशिक्षण केंद्र, तुरची येथील सत्र क्रमांक १० मधील ४७६ प्रशिक्षणार्थी महिला पोलीस अंमलदारांचा दीक्षांत संचलन सोहळा केंद्राच्या कवायत मैदानावर पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे विशेष पोलीस महानिरीक्षक (प्रशिक्षण व खास पथके) प्रवीणकुमार पडवळ यांनी मानवंदना स्वीकारली. परेड कमांडर नवप्रविष्ठ प्रशिक्षणार्थी महिला पोलीस अंमलदार / १३३ अंजली महेंद्र यादव (भरती जिल्हा रत्नागिरी) यांनी प्रमुख पाहुण्यांना मानवंदना दिली.

प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी अशोक काकडे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे उपस्थित होते.