
सांगली, ता.९: सांगली उपायुक्त वैभव साबळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात. एका इमारतीच्या बांधकाम परवण्यासाठी सात लाखांची मागणी केल्याप्रकारणी तक्रारदाराच्या तक्रारीवरून लाचलूचपत प्रतिबंधक विभागणी हि कारवाई केली. ह्या कारवाईने महापालिका प्रशासनात खळबळ उडाली असून अनेकांची धाबे दणाणले आहेत. लाचलुचपत विभागाने उपायुक्त वैभव साबळे यांच्या विरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेली अधिक माहिती अशी कि, सांगली उपायुक्त वैभव साबळे एका चौवीस मजली इमारतीच्या बांधकाम परवण्यासाठी दहा लाखांची मागणी केली होती ती तोडजोडीनंतर सात लाखांवर करण्यात आली. याबाबत लाचलुचपात प्रतिबंधक विभागाला तक्रार देण्यात आली होती. दिलेल्या तक्रारीवरून लाचलूचपत विभागाने सापळा रचला व तक्रारीप्रमाणे उपायुक्त वैभव साबळे यांनी सात लाख रुपये घेतल्याचे निष्पन्न झाले. याप्रकारणी उपायुक्त यांच्यावर विश्रामबाग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील अधिक तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग करीत आहे.