
कुपवाड, ता.७ : कुपवाड एम. आय. डी. सी. पोलीस ठाणे हद्दीतील किरण लोखंडे टोळी दोन वर्षाकरिता हद्दपार करण्यात आली. गुन्हेगारी टोळ्यांची दहशत मोडुन काढून त्यांचे समुळ उच्चाटन व्हावे या पार्श्वभुमीवर पोलीस अधीक्षक, सांगली संदीप घुगे, यांच्याकडून सदरची हद्दपारीची कारवाई करण्यात आली.
कुपवाड एम. आय. डी. सी. पोलीस ठाणेच्या हद्दीतील हद्दपार टोळीतील प्रमुख नावे
- १) किरण शंकर लोखंडे, वय- २३ वर्षे, रा. वाघमोडेनगर, कुपवाड, ता. मिरज, जिल्हा सांगली
- २) संदेश रामचंद्र घागरे, वय २१ वर्षे, रा.वाघमोडेनगर, कुपवाड, ता. मिरज, जि. सांगली
- ३) सोनु ऊर्फ बापु हरी येडगे, यय २८ वर्षे, रा. मायाक्कानगर, बामणोली, ता. मिरज, जि. सांगली
एम. आय. डी. सी. कुपवाड पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हेगार किरण लोखंडे टोळीस पोलीस अधीक्षक, सांगली संदीप घुगे यांनी सांगली व कोल्हापूर या दोन जिल्ह्यातुन २ वर्षे कालावधीकरीता हद्दपार आदेश पारीत केला आहे.
या टोळीविरुद्ध गुन्हे
या टोळीविरुद्ध सन २०२० ते २०२४ मध्ये संगनमत करुन खुन, खुनाचा प्रयत्न, बेकायदेशीर जमाव जमविणे, अपहरण, बेकायदेशीर अग्नीशस्त्र व घातक हत्यारे जवळ बाळगुन त्याचा धाक दाखवून व गंभीर दुखापत करणे अशा स्वरुपाचे शरिराविरुद्धचे गुन्हे करीत आहेत.
नमुद सामनेवाले हे कायद्याला न जुमानणारे आहेत. त्यामुळे या टोळीविरुध्द महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ अन्वये प्रभारी अधिकारी, एम. आय. डी. सी. कुपवाड पोलीस ठाणे यांनी पोलीस अधीक्षक, सांगली यांना प्रस्ताव सादर केला होता. पोलीस अधीक्षक, सांगली यांनी सदर प्रस्तावाचे अवलोकन करुन, प्रणिल गिल्डा उपाधीक्षक मिरज चौकशी अधिकारी मिरज, यांचेकडे चौकशी कामी पाठविला. त्यांचा चौकशी अहवाल, टोळीविरुध्द दाखल असलेल्या गुन्हयांचा व सद्यस्थितीचा अहवाल, त्यांचेवरील प्रतिबंधक कारवाई तसेच त्यांच्या हालचाली या सर्व बाबी विचारात घेऊन, पोलीस अधीक्षक, सांगली यांनी सलग सुनावणी घेऊन, नैसर्गिक न्यायतत्वांचा व्यापक विचार करुन टोळी प्रमुख किरण शंकर लोखंडे, संदेश रामचंद्र घागरे, सोनु ऊर्फ बापु हरी येडगे यांना महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन १९५१ चे कलम ५५ मधील तरतुदीनुसार सांगली व कोल्हापूर या २ जिल्ह्यातुन २ वर्षे कालावधीकरीता तडीपारी आदेश पारीत केला आहे. आगामी सण उत्सव या काळात टोळीने गुन्हे करणा-या टोळ्यांवर बारकाईने नजर ठेवुन त्या नेस्तनाबूत करण्यासाठी यापुढेही कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
सदर कारवाई मध्ये
पोलीस अधीक्षक, सांगली संदीप घुगे यांचे मार्गदर्शनाखाली सतीश शिंदे, पोलीस निरीक्षक, स्था. गु. अ. शाखा, सांगली, दिपक भांडवलकर, सहा. पोलीस निरीक्षक, एम.आय.डी.सी कुपवाड पो. ठाणे, पोहेकों/बसयराज शिरगुप्पी, पोकों/दिपक गट्टे, स्था. गु. अ. शाखा, सांगली, तसेच श्रेणी पो. उपनिरीक्षक राजेंद्र नलावडे, पोहेकों/संदीप पाटील एम. आय. डी. सी. कुपवाड पोलीस ठाणे यांनी भाग घेतला.