हिंदवी स्वराज्यासाठी जिझले
रयतेसाठी सुखाचे दिवस घेऊन आले,
आई भवानीच्या आशीर्वादाने
आमचे राजे “छत्रपती” झाले..!!

सांगली, ता.७ : ६ जून राज्याभिषेक दिनानिमित्त सकल मराठा समाजाच्या वतीने स्टेशन चौक,सांगली येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मदिवसापासून राज्याभिषेक पर्यंतचे सर्व छायाचित्रे प्रदर्शन मोठ्या डिजिटल वर चित्ररूपी लावण्यात आले होते. ध्येयमंत्र व प्रेरणा मंत्र म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यात आले.

दिल्ली येथे झालेल्या मार्शल आर्ट गेम्स फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने आयोजित केलेल्या नॅशनल गेम्स मध्ये कन्निंजुकु चॅम्पियन्स कराटे अकॅडमी यांच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले होते. त्या खेळाडूंचे सांगली आमदार सुधीर गाडगीळ व उपस्थित प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. खेळाडूंना मिळालेले यशाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी सकल मराठा समाज, पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, आदी परिसरातील नागरिक उपस्थित होते.