
सांगली, ता.६ : स्वराज्य रिक्षा संघटना जिल्हा सांगली यांच्यावतीने आज शुक्रवार (ता.६) रोजी सण २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात इयत्ता दहावीमध्ये उत्कृष्ट गुणवत्ता मिळवून उत्तीर्ण झालेल्या मुलींना उपप्रादेशिक कार्यालय अमित गुरव, आकाश गालीदे यांच्या हस्ते सायकल वाटप करण्यात आले. आरटीओ चे आकाश गालिंदे व अमित गुरव यांच्याकडून मुलींना उत्कृष्ट गुणवत्तेबद्दल प्रत्येकी एक हजार रुपये बक्षीस म्हणून देण्यात आले तसेच त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
६ जून राज्याभिषेक असल्याने 352 व्या राज्याभिषेक निमित्त छत्रपती शिवरायांना पुष्पहार घालून अभिवादन करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

- चार मुलींना सायकल वाटप करण्यात आले.
- १) श्रावणी दिगंबर दिनकर कदम (सांगली) ९१.४०%
- २) जोया फीरोज कलावंत ( सांगली ) ८६.०० %
- ३) श्वेता दिगंबर शिंदे ( पलूस ) ८४.६०%
- ४) पूनम चंद्रकांत पाटील ( आटपाडी ) ७०.००%

२०२३ वर्षापासून स्वराज्य रिक्षा संघटना सांगली जिल्हा हा उपक्रम करण्याचे योजले. गेले दोन वर्षे २०२४ – २०२५ पासून स्वराज्य रिक्षा संघटना जिल्हा अध्यक्ष राम (भाऊ) पाटील व संघटनेचे सदस्य यांच्यावतीने इयत्ता दहावीत चांगली गुणवत्ता मिळवणाऱ्या रिक्षा चालकांच्या मुलींना सायकल वाटप करून ही सन्मान योजना चालु केली आहे. यावेळी रिक्षा संघटनेचे पदाधिकारी सदस्य व सभासद उपस्थित होते.