मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह चिंचणी येथे प्रवेश प्रक्रिया सुरू

सांगली, ता.५ : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत चालविण्यात येत असलेल्या कडेगाव तालुक्यातील मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह चिंचणी येथे विनामूल्य ऑनलाईन पोर्टल‌द्वारे प्रवेश सुरू आहेत. प्रवेशासाठी अर्ज ऑनलाईन पध्दतीने https://hmas.mahait.org या
वेबसाईटवर भरावयाचा आहे, असे वसतिगृहाचे अधिक्षक यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.

या वसतिगृहामध्ये मागासवर्गीय, इतर मागासवर्गीय, अनुसूचित जमाती, अपंग, अनाथ, आर्थिक मागास, विमुक्त जाती भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग इत्यादिंना प्रवर्गनिहाय व गुणवत्तेनुसार इयत्ता 8 वी, 11 वी, प्रथम वर्ष बी.ए., बी. एस्सी., बी. कॉम. आणि प्रथम वर्ष व्यावसायिक शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थींनीसाठी विनामुल्य ऑनलाईन पोर्टलव्दारे प्रवेश सुरू आहेत.

वसतिगृहात मोफत निवास व भोजन व्यवस्था, मोफत शालेय साहित्य (वह्या, पुस्तके, स्टेशनरी इत्यादी), मोफत शालेय गणवेश दोन नग, रेनकोट / छत्री, गमबूट, मासिक निर्वाह भत्ता 600 रूपये व सहल खर्च 2 हजार रूपये, महाविद्यालय विभाग स्टेशनरीकरिता 4 हजार रूपये, प्रोजेक्ट 1 हजार रूपये व गणवेशाकरिता 2 हजार रूपये अशा सुविधा असल्याचे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button