सांगली, ता. ५ : एकात्मिक बाल विकास सेवा योजना सांगली ग्रामीण प्रकल्पांतर्गत रिक्त असलेल्या अंगणवाडी सेविका पाच व अंगणवाडी मदतनीसच्या एका पदासाठी पात्र महिला उमेदवारांनी त्यांचे अर्ज दिनांक 18 जून 2025 पर्यंत एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प सांगली ग्रामीण या कार्यालयात कार्यालयीन वेळेत साक्षांकित प्रतीसह समक्ष पोहोच करावयाचे आहेत. मुदतीनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, असे बाल विकास प्रकल्प अधिकारी सांगली ग्रामीण यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.
अंगणवाडी सेविका रिक्त पद असलेल्या अंगणवाडी केंद्र
- नाव व क्रमांक व रिक्त पद संख्या
- बुधगाव 46 – 01 पद
- समडोळी 20 – 01 पद
- दुधगाव 64, 67 – 02 पदे
- सांबरवाडी 122 – 01 पद
- काकडवाडी 106 या अंगणवाडी केंद्रामध्ये अंगणवाडी मदतनीसचे एक पद रिक्त आहे.
अटी व शर्ती –
उमेदवाराचे वय दिनांक 18 जून 2025 रोजी वय वर्षे 18 वर्षाचे वरील व 35 वर्षाच्या आतील असावे.
- विधवा महिला उमेदवारासाठी वयोमर्यादा दिनांक 18 जून 2025 रोजी 18 वर्षे पूर्ण व 40 वर्षाच्या आतील राहील. अंगणवाडी सेविका / मदतनिस पदासाठी शैक्षणिक पात्रता किमान 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- महिला उमेदवार ही त्या गावची स्थानिक रहिवासी असावी.
- उमेदवाराने फक्त स्थानिक गावातीलच अंगणवाडी सेविका / मदतनीस पदासाठी अर्ज करणे बंधनकारक आहे.
- या पदासाठी लहान कुटुंबाची अट लागू राहील.
असे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे