कोरोना संदृश्य आजाराची लक्षणे आढळून आल्यानंतर त्वरित तपासणी करून उपचार घ्यावेत – सत्यम गांधी आयुक्त सांगली

सांगली, ता.५ : सध्या महाराष्ट्रात व सांगली मिरज कुपवाड महापालिका क्षेत्रात काही कोरोना आजाराचे रुग्ण आढळुन आले आहेत. या आजाराचा फैलाव वाढू नये याकरिता नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच नागरिकांनी घाबरून न जाता कोरोना संदृश्य आजाराची खालील लक्षणे आढळून आल्यानंतर त्वरित तपासणी करून उपचार घ्यावेत. असे आवाहन महापलिका प्रशासना कडून करण्यात येत आहे.


खालील प्रमाणे नागरिकांनी सुचनांचे पालन करावे.

  • कोरोना आजाराची लक्षणे
  • १) ताप
  • २) अंगदुखी डोकेदुखी
  • ३) सर्दी
  • ४) घशामध्ये खवखवणे
  • ५) खोकला
  • ६) श्वसनास त्रास

प्रतिबंधात्मक उपाययोजना

  • १) सोशल डिस्टन्स
  • २) मास्कचा वापर करणे
  • ३) गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळणे
  • ४) सॅनिटायझरचा वापर करणे
  • ५) वरचेवर हात धुणे
  • ६) ताप व ताप सदृश्य आजाराची लक्षणे आढळूनआल्यास तात्काळ तपासणी करून घेणे.

सर्व खबरदारी घेऊन वरील दिलेले लक्षणे आढळून आल्यास जवळील महानगरपालिका आरोग्य केंद्र /दवाखाने, आयुष्मान आरोग्य मंदीर / आपला दवाखाना / सरकारी रुग्णालयामध्ये तात्काळ संपर्क साधून डॉक्टरांच्या सल्ल्याने तपासणी वऔषधोपचार करून घ्यावे. असे अहवान उप आयुक्त स्मृती पाटील व डॉ. वैभव पाटील वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांनी केले आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button