इंग्रजी शाळेत प्रवेशासाठी धनगर समाजातील विद्यार्थ्यांनी 15 जूनपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

सांगली, ता. ५ : इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांकरिता शहरातील इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळांमध्ये शिक्षण देणे या योजनेअंतर्गत सांगली जिल्ह्यामध्ये डॅफोडिल इंग्लिश मीडियम स्कूल, उमदी ता. जत व एस. के. इंटरनॅशनल स्कूल रेठरे धरण, ता. वाळवा या दोन शाळांना नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळा म्हणून शासनाकडून मान्यता देण्यात आलेली आहे. या शाळांमध्ये इयत्ता 1 ली ते 8 वी मध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या धनगर समाजातील विद्यार्थ्यांच्या प्रवेशाकरिता त्यांच्या पालकांनी 15 जून 2025 पर्यंत संपर्क साधून अर्ज करावा, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभाग सांगलीच्या सहाय्यक संचालक धनश्री भांबुरे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.

इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना शहरातील नामांकित निवासी शाळेमध्ये इयत्ता 1 ली ते इयत्ता 12 वी मोफत शिक्षण देण्यासाठी सन 2025-26 मधील इयत्ता 1 ली ते इयत्ता 8 वी च्या प्रवेशाकरिता सांगली जिल्ह्यातील धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांकडून अर्ज मागाविण्यात आले आहेत.

  • प्रवेशसाठी जोडावे लागणारे कागदपत्रे
  • सन 2025-26 वर्षाकरिता या शाळामध्ये मोफत प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली असून प्रवेशाकरिता अर्जासोबत
  • विद्यार्थ्यांचे जन्म प्रमाणपत्र
  • जातीचे प्रमाणपत्र
  • आधारकार्ड
  • पालकांचे रक्कम रू. 1 लक्षच्या मर्यादेतील उत्पन्नाचा दाखला

इत्यादी कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.

प्रवेश प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांना निवास, भोजन व्यवस्था, शैक्षणिक साहित्य इत्यादी सर्व सुविधा मोफत पुरविल्या जाणार आहेत.

विद्यार्थ्यांना या शाळामधील अन्य प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांसमवेत एकत्रितपणे शिक्षण दिले जाणार आहे. शाळांमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या इयत्ता 1 ली ते 8 वी च्या विद्यार्थ्यांकरिता प्रवेश मंजूर करण्यात येईल व पुढे 12 वी पर्यंत मोफत शिक्षणाचा लाभ अनुज्ञेय राहील.

  • अधिक माहितीसाठी इथे संपर्क साधावा..

सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कलयाण, सांगली यांचे कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन जुना बुधगांव रोड, सांगली यांच्याकडे संपर्क साधावा, असे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button