जागतिक पर्यावरण दिन निमित्त मनपाचा वतीने विविध ठिकाणी २५०० वृक्षारोपण करून साजरा

सांगली, ता. ५ : जून जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या वतीने विविध ठिकाणी वृक्षारोपण करून साजरा करण्यात आला आहे. सत्यम गांधी आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली व अति आयुक्त रविकांत अडसूळ , उप आयुक्त स्मृती पाटील यांच्या नेतृत्वा खाली उद्यान अधीक्षक गिरीश पाठक यांची टीम सदरचा उपक्रम राबविण्यात आला आहे.

सांगली येथील महावीर उद्यान येथे आमदार इद्रिसभाई नायकवडी यांच्या हस्ते व उप आयुक्त स्मृती पाटील यांच्या उपस्थितीत दुर्मिळ वृक्षाची लागवड करून सदरच्या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे.

दुर्मिळ प्रजाती मधील काही झाडे लावून त्याचे जतन करण्यात येणार आहे, त्या मध्ये शमी ,बुद्धवड , देवसावर म्हेसूर वड,सुरुगी ,पिपरी मुजकुद ,खेंर पळस ,तेटू, इत्यादी झाडे लावण्यात आले आहेत.

मिरज

आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते वसंत हौसिंग सोसायटी मिरज येथे वृक्षारोपण करण्यात आले आहे, या वेळी अति आयुक्त रविकांत अडसूळ उप आयुक्त स्मृती पाटील, डॉ रवींद्र ताटे ,उपस्थितीत होते देशी स्वरूपाची झाडे लावण्यात आले आहेत.

पार्श्वनाथ नगर व सिद्धेश्वरनगर

मा सत्यम गांधी आयुक्त यांच्या हस्ते वृक्ष लागवड करण्यात आले या वेळी माजी नगरसेविका एडवोकेट स्वातीताई शिंदे उपस्थितीत होत्या,प्र सहा आयुक्त सचिन सागावकर, स्वछता निरीक्षक याकूब मद्रासी, सिद्धार्थ ठोकळे, अजित गुजराती पर्यावरण अभियंता या वेळी उपस्थित होते.

सांगली समडोळी रोड कचरा डेपो येथे २०००,पेक्ष्या जास्त बांबू रोपांची लागवड करण्यात येत आहे, या वेळी मनपा वतीने चागले नियोजन केले आहे, आज पावसाने साथ दिल्याने सर्वांनी उत्साहात वृक्षारोपण करून आनंद व्यक्त केला .उप आयुक्त स्मृती पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले आहे.

यावेळी बचत गटाच्या महिलांच्या सहभागाने वृक्षारोपण करण्यात आले आहे. वृक्षप्रेमी,व्यक्ती संघटना व संस्था यांनी या उपक्रमामध्ये आपला सहभाग नोंदविला होता, जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा करण्यात आला आहे.

उद्यान अधीक्षक गिरीश पाठक व आयुक्त स्मृती पाटील यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button