
सांगली, ता. ४ : जिल्हातील आकरा ठिकाणी घरफोडी करणारे ०४ आरोपी सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केले जेरबंद. संतोष तुळशीराम चव्हाण, वय ४२ वर्षे, आशुतोष संतोष चव्हाण, वय २१ वर्षे, दोघेही रा. एकता नगर, सातारा रोड, जत, जि सांगली, करण अर्जुन चव्हाण, वय १९ वर्षे, रा होनसळ, ता सोलापूर, जि सोलापूर, पांडुरंग सुनिल पवार, वय २६ वर्षे, रा होटगी, ता सोलापूर, जि सोलापूर असे जेरबंद केलेल्या आरोपीचे नावे आहेत.
जप्त करण्यात आलेला मुद्देमाल
- २०,१८,४५०/- रू. किंमतीचे सोन्याचे २१५.९५ ग्रॅम दागिने
- १,०२,०३७ /- रू. किमतीचे चांदिचे १०२१.९६ ग्रॅम दागिने
- २,७००/ रू. किंमतीच्या ०३ मध्यम आकारांच्या तांब्याच्या कळश्या
- ५,००,०००/-रू. एक महिंद्रा कंपनीची झायलोची चार चाकी गाडी
- ४००/- रू. रोख रक्कम
- १,२७०/- रू. स्टीलची पाईप, कटावणी, चाकू, पाना, स्कू ड्रायव्हर, बॅटरी, मास्क, हॅन्डग्लोज, पिशवी इत्यादी साहित्य एकूण २६,२४,८५७/-रू. (सव्वीस लाख चोवीस हजार आठशे सत्तावन्न रूपये) मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिसांची अधिक माहिती अशी की, मा. पोलीस अधीक्षक संदीप घुगे, यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस मालमत्तेविरुध्दचे गुन्हे करणारे इसमांची माहिती काढुन त्यांचेवर कारवाई करून, मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते. सदर आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक सतिश शिदे, स्था. गु. अ. शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा. पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन व स्टाफ यांचे एक पथक तयार केले. त्या अनुशंगाने जत विभागात पेट्रोलिंग करीत असताना सहा पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांचे पथकामधील पोशि / प्रमोद साखरपे, पोह/हणमंत लोहार व पोना/सोमनाथ गुंडे यांना त्यांचे बातमीदाराकडून बातमी मिळाली की, संतोष चव्हाण व त्यांचा मुलगा आशुतोष तसेच करण चव्हाण व पांडुरंग पवार, असे चौघेजण एका पांढ-या रंगाच्या झायलो चारचाकी गाडीने जत येथून सांगलीकडे सोन्याचे व चांदिचे दागिने घेवून विक्री करीता जाणार असून त्या दरम्यान ते जत येथील जत ते कवठेमहांकाळ रोडवर असलेले जाधव वस्ती येथील रज्जाक नगारजी यांचे बंद असलेल्या हॉटेल सानिया गार्डन येथे थांबणार आहेत.
मिळालेल्या बातमीने नमुद पथक नमूद ठिकाणी सापळा रचून सहा पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन व पथक सदर गाडीजवळ जावून गाडीतील ०४ इसमांना पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेतले. त्यांना त्यांचे नाव गाव विचारता त्यांनी त्यांची नावे संतोष चव्हाण, आशुतोष चव्हाण, करण चव्हाण, पांडुरंग पवार अशी सांगितली. त्यांचे अंगझडतीचा व गाडीची झडती घेतली असता, सदर गाडीचे मधल्या सीटच्या खाली एक कापडी पिशवीमध्ये सोन्याचे व चांदिचे दागिने व गाडीचे मागील बाजूस सीटखाली कापडी पिशवीमध्ये स्टीलची पाईप, कटावणी, चाकू, पाना, स्कू ड्रायव्हर, बॅटरी, मास्क, हॅन्डग्लोज इत्यादी साहित्य मिळून आले. त्यांचेकडे सदर मालाबाबत विचारणा केली असता त्यांनी गेल्या काही महिन्यात जत, विटा, इस्लामपूर, चिचणी वांगी व आटपाडी परिसरात बंद घरे तसेच दुकान फोडून घरफोडी चोरी केली असून त्या गुन्हयातील चोरीचा मुद्देमाल विकण्यासाठी घेऊन जात असलेबाबत कबुली दिली.
सदर माल व केलेले गुन्हे या अनुशंगाने जत, विटा, चिचणी वांगी, इस्लामपूर व आटपाडी पोलीस ठाणेचा क्राईम अभिलेख तपासला असता वरील प्रमाणे गुन्हे दाखल असल्याची खात्री झाली. त्यांचा कब्जातील माल जप्त केला आहे.
रेकॉर्डवरील गुन्हेगार
आरोपी संतोष तुळशीराम चव्हाण हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याचेवर जत पोलीस ठाणे व कर्नाटक राज्यात घरफोडी व चोरीचे गुन्हे दाखल आहेत.
सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपास कामी जत पोलीस ठाणेकडे वर्ग करण्यात आला असुन पुढील तपास जत पोलीस ठाणे करीत आहेत.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांचे मार्गदर्शानाखाली पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्था. गु. अ. शाखा, सांगली, सपोनि/ सिकंदर वर्धन, सपोनि/ कळेकर, सपोनि/ सायबर पोलीस अधिकारी सोपोफौ / अनिल ऐनापुरे, हणमंत लोहार, संजय पाटील, सुकांत साळुंखे, अतुल माने, अमोल ऐदाळे, इम्रान मुल्ला, संकेत मगदुम, सोमनाथ गुंडे, प्रमोद साखरपे, सुनील जाधव, प्रमोद साखरपे, सुनील घस्ते, अभिजित अधिकारी, अयज बेंदरे, वनिता पक्ष, राज्य महामार्ग पोलीस कडील विजय पाटील, सुहास पाटील सायबर पोलीस ठाणेकडील सतिश आलदर, करण परदेशी, अजय पाटील, अभिजित पाटील आदीने केले.