
कुपवाड , ता.३ : कुपवाड सहायक दुय्यय निबंधक कार्यालय नवीन जागेवरती स्थलांतरित करण्यात आले. सहायक दुय्यय निबंधक कार्यालयची इमारत ही साडे सहा गुंठावर दुमजली इमारत उभारलेली आहे. कुपवाड भारत सूतगिरणी जवळील बसस्थानकाजवळील नवीन जागेवर मंगळवार (ता. ३) सकाळी नागरिकांसाठी खूले करण्यात आले. यापूर्वी खारे मळा परिसरात सहायक दुय्यय निबंधक कार्यालय होते.

सहायक जिल्हा निबंधक वर्ग एक तथा मुद्रांक प्रभारी जिल्हा अधिकारी श्रीराम कोळी यांचे हस्ते फित कापून कार्यालय खूले करण्यात आले. कार्यक्रमास सहायक जिल्हा निबंधक वर्ग एक तथा मुद्रांक प्रभारी जिल्हा अधिकारी श्रीराम कोळी, कुपवाडचे सहायक दुय्यम निबंधक सुनील पाथरवट, माजी नगरसेवक गजानन मगदूम, सामाजिक कार्यकर्ते श्रीराम आलाकुंटे, राजेंद्र दबडे, मिरसाब ढाले, वीरेंद्र यादव, सुषमा वारे, गणेश कोरे, सुनील कवठेकर, नारायण माळी, सचिन बिरनाळे, असिफ सय्यद यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
एकूण साडेसहा गुंठ्यावर उभारलेली कार्यालयाची दुमजली इमारत सर्व सुविधायुक्त असल्यामुळे कुपवाडचे सहायक दुय्यम निबंधक सुनील पाथरवट यांच्या पाठपुराव्यातून हा निर्णय घेण्यात आला.