कुपवाड : प्रतिनिधी

कुपवाड, ता.३०: औधोगिक वसाहतीत रेकॉर्डवरील गुन्हेगार श्रवणेशनाथ चौगुले याच्या खून प्रकरण्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगार रितेश वसंत चव्हाण याला सांगली स्थानिक गुन्हे शाखेने अटक केले. मयत श्रवणेशनाथचा खून रविवारी (ता.२५) रोजी त्याच्या राहत्या घरात छातीवर व डोक्यावर हत्याराने वार करून करण्यात आला होता. खून करून घटनास्थळावरून आरोपीने पलायन केले होते. सदर घटनेची कुपवाड पोलीसांत गुन्हा नोंद करण्यात आले असून आरोपीच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना झाले होते.
पोलिसांची अधिक माहिती अशी की, रविवारी (ता.२५) रोजी रात्री साडे आठच्या सुमारास श्रवणेशनाथ महावीर चौगुले वय २९ वर्षे, राहणार सिद्धिविनायक पार्क, शिवशक्ती नगर, कुपवाड तालुका मिरज याच्या राहत्याघरी श्रावनेशच्या मित्रांनी श्रावणेशच्या छातीवर आणि डोक्यावर हत्याराने वार करून खून केला. ही घटना समजताच घटनास्थळी कुपवाड पोलीस, पोलीस अधिक्षक संदीप घुगे, मिरज डीवायएसपी प्रणील गिल्डा, सांगली स्थानिक शाखेचे सतीश शिंदे व कुपवाड पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर यांनी धाव घेतली.
पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीच्या शोधासाठी कुपवाड पोलीस व स्थानिक शाखेचे पथके रवाना झाले. स्थानिक गुन्हे शाखेचे सहा. पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांच्या पथकातील पोलीस सागर लवटे यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, मयत श्रवणेशनाथच्या खून मयतच्या ओळखिच्या बीड जिल्ह्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगार रितेश चव्हाण याने केला असून तो सध्या राहण्यास आंबेजोगाई , बीड येथे असल्याची त्या दिलेल्या माहितीने पथकाने दिलेल्या नमूद ठिकाणी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले व त्याची चौकशी केली असता त्यांने त्याचे नाव रितेश चव्हाण रा. वैदूवस्ती, विलासनगर, जि. बीड सद्या रा. आंबेजोगाई , बीड सांगितले.
सदर गुन्हाबाबत त्याची चौकशी केली असता मयत व आरोपी कुपवाड औधोगिक वसाहतीत भाड्याच्या खोलीत दोघजन राहत आसताना शनिवार (१७) रोजी रोजी कुपवाड एम. आय.डी.सी. पोलीस ठाणे हद्दीतील गुलमोहर कॉलनी येथे आरोपी व त्याचे साथीदारांनी मोटार सायकलवरून येवून महिलेच्या हातातील पर्स जबरदस्तीने हिसडा मारून जबरी चोरी केली होती. त्या जबरी चोरीमध्ये मिळालेल्या दागिन्याचे वाटणीवरून मयत व आरोपी यांचेमध्ये वाद झाला त्या वादामध्ये आरोपी व साथीदारांनी मिळून त्याचे भाडयाचे राहते खोलीमध्ये मयताच्या छातीवर व डोक्यावर धारदार शस्त्राने वार करून त्याचा खुन केल्याची कबुली दिली.
सदर आरोपी रेकॉर्डवरील
रितेश वसंत चव्हाण हा बीड जिल्हयातील रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यावेवर चोरी व जबरी चोरीचे गुन्हे नोंद आहेत.
या गुन्हयातील इतर निष्पन्न आरोपींचा शोध सुरू आहे. सदर आरोपी पुढील तपास कामी एम.आय.डी.सी. कुपवाड पोलीस ठाणेकडे वर्ग करण्यात आले असुन पुढील तपास एम.आय.डी.सी. कुपवाड पोलीस ठाणे करीत आहेत.