
कुपवाड : प्रतिनिधी

कुपवाड, ता.२६: औधोगिक वसाहतीतील एका एकोणतीस वर्षीय युवकाचा खून केल्याची घटना रविवारी (ता.२५) रोजी रात्री साडे आठच्या सुमारास घडली. या घटनेत श्रवणेशनाथ महावीर चौगुले वय २९ वर्षे, राहणार सिद्धिविनायक पार्क, शिवशक्ती नगर, कुपवाड तालुका मिरज याच्या राहत्याघरी श्रावनेशच्या मित्रांनी श्रावणेशच्या छातीवर आणि डोक्यावर हत्याराने वार करून खून केला. सोप्या आणि अशोक मोरे ( नाव, पत्ता संपूर्ण माहीत नाही ) असे दोघा संशयित आरोपीचे नावे आहेत. याबाबत कुपवाड पोलिसात दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत उमेश आप्पासाहेब पाटील वय ४५ वर्षे धंदा व्यापार राहणार अरिहंत बंगला, मगदूम प्लॉट, घरपट्टी ऑफिस शेजारी, विजयनगर पूर्व सांगली, तालुका मिरज यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांच्या अधिक माहिती अशी की, रविवारी (ता.२५) रात्री साडे आठच्या सुमारास मयत श्रवणेश याच्या राहत्याघरी अज्ञात कारणासाठी श्रवणेशचे दोन संशयित मित्र सोप्या आणि अशोक मोरे यांनी छातीवर आणि डोक्यावर हत्याराने वार करून गंभीर जखमी करून खून केला. ही घटना समजताच घटनास्थळी कुपवाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर व त्यांची टीम यांनी धाव घेतली. आयुष्य हेल्पलाईन टीमच्या मदतीने निशब्द पडलेल्या श्रवणेशला मिरज शासकीय रुग्णालयात दाखल केले असता वैधकीय अधिकारी यांनी मृत घोषित केले. घटनास्थळी पोलीस अधीक्षक संदीप घुगे, मिरज डीवायएसपी प्रणील गिल्डा, सांगली स्था. गु. शाखेचे पोनि/ सतीश शिंदे यांनी भेट दिली. खुनाचे अद्याप कारण स्पष्ट झाले नसून दोघा संशयित आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेचा पुढील अधिक तपास सपोनि/ दीपक भांडवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली कुपवाड पोलीस करीत आहे.