
बुधगाव, ता.२६ : बुधगावात स्मार्ट मीटरच्या विरोधात सोमवारी सकाळी दहा वाजता नागरिकांच्या वतीने पायी मोर्चा काढण्यात आला. गावात स्मार्ट मीटर बसवले आहे. या स्मार्ट मीटरमुळे लाईटबिल दुप्पट-तिप्पट पटीने वाढीव आले आहे. हे स्मार्ट मीटर काडून पूर्वीचे मीटर बसवावे आणि वाढीव आलेले बिल कमी करावे यासाठी गावकरांच्या वतीने बुधगांव महादेव मंदिर पासून ते बुधगांव जोतिबा नगर ते बुधगाव MSEB ऑफिस पर्यंत पायी मोर्चा काढण्यात आला.

यावेळी गावातील नागरिक, राजकीय नेते व सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले. स्मार्टमीटरच्या विरोधात ‘अन्याय कारक वीजबिल ‘ रद्द झालेच पाहिजे. पूर्वीचे मीटर मिळाले पाहिजे अशा जोरदार घोषणा बुधगाव MESB ऑफिस समोर देण्यात आल्या.