
सांगली, ता.२४ : स्नेहबंध फाउंडेशन संचलित सांगली येथील कोहंम पुनर्वसन केंद्र आणि स्नेहबंध केअर सेंटर मध्ये श्री ज्ञानेश्वर माऊली महिला भजनी मंडळ भोसे यांच्यामार्फत संगीत भजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये ज्येष्ठ संगीत शिक्षक श्री सदाशिव कुंभार गुरुजी, हार्मोनियम वादक आणि गायिका सुमती कुंभार, व तबला आणि मृदंग वादक बबन कुंभार तसेच इतर कलाकारांनी सुंदर कला सादर केली. स्नेहबंध संस्थेच्या संस्थापिका सौ. जोशी मॅडम, शाखा व्यवस्थापक दीपक कोरे, दत्तात्रय कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संगीत भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी कार्यक्रमात सुवर्णा कुंभार, आशा कुंभार, अश्विनी कुंभार, सुमन कुंभार आणि सतीश कुंभार तसेच कोहम केंद्रातील आणि स्नेहबंध केअर सेंटर मधील लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.