
सांगली, ता.२३ : महाराष्ट्रचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगली दौऱ्यावर शुक्रवार (ता.२३) असताना त्यांच्या उपस्थितीत कार्यकर्ता संवाद मेळावा पार पडला. या संवाद मेळाव्यात भाजपा सांगली जिल्हाध्यक्ष पदी प्रकाश ढंग यांची फेरनिवड झाल्याबद्दल मुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस यांनी अभिनंदन व सत्कार केला आणि जिल्हाध्यक्ष पदाच्या नव्या कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी प्रकाश ढंग म्हणाले की, आणखी जोमाने तसेच समर्पणाने पक्षाचे काम करून जिल्ह्यात भाजपा संघटन आणखी मजबूत करणार आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीत भाजपचा झेंडा फडकविण्याचा संकल्प जाहीर केला. कार्यकर्ता संवाद मेळाव्यात सर्वांना आदरणीय मुख्यमंत्र्यांचे मार्गदर्शन लाभले.