कुपवाड : प्रतिनिधी

कुपवाड, ता. २२ : कुपवाड मालगाव (ता. मिरज) हद्दीतील बग्यास डेपोस आग लागल्याची घटना सोमवार (ता.१९) रोजी सकाळी साडे अकराच्या सुमारास घडली. याबाबत कुपवाड पोलीसांत नोंद झाली आहे. यात बग्यास डेपोला लागलेल्या आगीत ८१ लाख वीस हजार किमतीचे २ हजार नऊशे टन बग्यास जळून खाक झाले. याबाबत वर्दी भरतकुमार नसीरभाई पटेल (वय ३८ रा. पाटीदार भवन जवळ, सांगली) यांनी गुरुवारी (ता. २२) दिली.