कुपवाड : प्रतिनिधी

कुपवाड, ता.२२ : अहिल्यानगर येथून गाय चोरल्याची घटना उघडकीस आली. याबाबत गणेश हेळवी व स्वप्नील लाड, रा. दोघेही अहिल्यानगर कुपवाड, ता. मिरज यांच्या विरुध्द कुपवाड पोलीसांत गुन्हा नोंद करण्यात आला. सदर घटनेबाबत मौला गुडूभाई शेख, वय ५० वर्ष, व्यवसाय – शेती, रा. प्रकाशनगर यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. पोलिसांची अधिक माहिती अशी की, बुधवार (ता.२२) रोजी दुपारी तीनच्या सुमारास एसटी कॉलनी कुपवाड येथील राम मंदिर पासुन मौला शेख यांची पन्नास हजार रुपये किंमतीची खिलारी जातीची गाय त्यांच्या समंती शिवाय गणेश हेळवी व स्वप्नील लाड या दोघां संशयीतांनी चोरून नेली. याबाबत कुपवाड पोलिसात गुन्हा नोंद झाला असून पुढील अधिक तपास कुपवाड पोलीस करीत आहे.