
कुपवाड
, ता.20 : शहरात मंगळवारी सकाळी सर्वपक्षीय मिळून भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली. पहलगाम (जम्मू) येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या बदल भारतीय सैन्यातील तिन्हीही दलाच्या जवानांनी ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानला जशास तसे प्रत्युत्तर देऊन यश मिळवले. ऑपरेशन सिंदुरच्या यशानंतर भारतीय सैन्याच्या शौर्यास सलाम करण्यास कुपवाड शहरातील नागरिकांनी भव्य तिरंगा रॅली काढली. रॅलीत शहरातील माजी सैनिक संघटना, सर्वपक्षीय नेते तसेच विविध संघटनाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक सहभागी झाले होते.
सोसायटी चौकातून रॅलीस सुरुवात झाली. शहरातील नागराज चौक, संत रोहिदास चौक, थोरला गणपती चौक, लिंगायत गल्ली, चावडी परिसर, जैन गल्लीसह सर्व मुख्य मार्गावरून बँडच्या तालात वाजतगाजत काढण्यात आली. भारत माता की जय, हिंदुस्तान जिंदाबादच्या जोरदार घोषणा देण्यात आल्या. यावेळी पहलगाम हल्ल्यातील देशातील मृत पर्यटकांना श्रद्धांजली वाहून रॅलीचा समारोप करण्यात आला. यात्रेचे आयोजन भाजपा शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांच्या नेतृत्वाखाली संघर्ष समितीचे अध्यक्ष सनी धोतरे, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष बिरु आस्की यांनी केले.
यावेळी माजी नगरसेवक गजानन मगदूम, अनिल कवठेकर, शेडजी मोहिते, सुभाष गडदे, राजेंद्र कुंभार, महेंद्र पाटील, कृष्णा राठोड, सुनील भोसले, संतोष सरगर, प्रकाश पाटील, रवींद्र सदामते, राहुल पाटील, विजय खोत, प्रमोद गोंडाजे, मोहन जाधव, महादेव मगदूम, आशुतोष धोतरे, आयनुद्दीन मुजावर, भाऊसाहेब पाटील, महावीर पाटील, दिनकर चव्हाण, अरुण रूपनर आदी उपस्थित होते.