
सांगली : प्रतिनिधी
सांगली, ता.७ : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त धनगर प्रीमियर लीग, भव्य टेनिस फुल्ल पिच डे क्रिकेट टुर्नॉमेंट सांगलीजिल्हाचे आयोजन केले आहे. धनगर प्रीमियर लीग सोमवार (१२ मे) ते (१४ मे) छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम, सांगली येथे होणार आहे. या प्रीमियर लीगसाठी आज (ता.७) दीडशे खेळाडूंसाठी दहा मालकांकडून बोली लागणार आहे.
- या प्रीमियर लीगमधील विजेतास बक्षीस पुढील प्रमाणे
- १) प्रथम क्रमांक ५१,००० रु.
- २) व्दितीय क्रमांक ३१,००० रु.
- ३) तृतीय क्रमांक २१,००० रु.
- ४) चतुर्थ क्रमांक ११,००० रु.
- मॅन ऑफ दि सिरीज साठी ट्रॉफी व गिफ्ट
- बेस्ट बॅट्समनसाठी ट्रॉफी व गिफ्ट
- सर्वोत्तम बॉलरसाठी ट्रॉफी व गिफ्ट
- मॅन ऑफ दि मॅचसाठी ट्रॉफी व गिफ्ट असे असणार आहे. या लीगचे सर्व सामने युट्यूब वर प्रदर्शित होणार आहेत.
या लीगचे आयोजक व कोर कमिटी डॉ. विक्रम कोळेकर, विनायक कोळेकर, डॉ. बसंत बुर्ले, गजानन सिध, राजाराम चोपडे, उत्तम पांढरे, डॉ. बबन धायगुडे, वैभव चोपडे, अनिल महारगुडे, बिराप्पा निगडे, आनंदा पांढरे, जालिंदर काळे, डॉ. आप्पा कटरे, दत्ता वाघमोडे, डॉ. आण्णा काबुगडे, श्याम एडगे, विठ्ठल कारंडे, दत्ता कुलाल आदीने केले आहे.