
पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान आणि पीओकेवर जबरदस्त एअर स्ट्राईक केला. भारतीय सैन्याकडून पाकिस्तानातील 9 ठिकाणी हल्ला केला असून या हल्ल्यात 50 पेक्षा अधिक दहशतवादी मारले गेले. मुंबईत झालेल्या 26\11 च्या दहशतवाद्यांना याच ठिकाणी प्रशिक्षण देण्यात आलं होतं तोच अड्डा भारताकडून टार्गेट करण्यात आला. भारताकडून चार मिसाईल डागण्यात आले.
मंगळवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास हा हल्ला करण्यात आला. या कारवाईला ‘ऑपरेशन सिंदूर’ असे नाव देण्यात आले आहे. विशेष म्हणजे लष्कर ए तोयबाच्या प्रशिक्षण केंद्रावर भारताकडून यशस्वी हवाई हवाई हल्ला करण्यात आलाय. भारताने पाकिस्तानातील मुजफ्फराबाद, कोटली, गुलपुर, बिंबर आणि सियालकोट, चक अमरू, मुरीदके, बहावलपूर अशा 9 ठिकाणी एअर स्ट्राईक केल्याचे पाहायला मिळाले.