सांगली : प्रतिनिधी

सांगली, ता.७ : नेर्ले येथील कासेगाव- पेट-हायवे येथे मंगळवार (ता.६) गांजा माल विक्रीसाठी आलेल्या दोघां संशयित आरोपींना सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखने अटक केले. किरण भिमराव घाडगे, वय ३० वर्षे, विरू शिवाजी मोरे, वय २९ वर्षे, दोघेही रा. कुंभार भट्टी, फलटण, ता फलटण, जि सातारा असे अटक केलेल्या दोघां संशयित आरोपीचे नावे असून त्यांच्याकडून १,२४,६५०/-रु. चा ४ किलो १५५ ग्रॅम गांजा माल जप्त केला. याबाबत दोघां संशयितावर कासेगाव पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोशि/अजय संभाजी बेंदरे, स्था. गु. अ. शाखा, सांगली पोलीस स्टेशन यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांची अधिक माहिती अशी की, पोलीस अधीक्षक, संदीप घुगे यांनी अंमली पदार्थ तस्करी, विक्री, वाटप व वितरण करणारे इसमांचेवर कारवाई करणेसाठी त्यांचे अधिनस्त स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली कडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांचे विशेष पथक स्थापन करण्यात आलेले आहे.
त्या अनुशंगाने मंगळवार (ता.६) रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा. पोलीस निरीक्षक, जयदीप कळेकर यांचे पथकामधील पोशि/अजय बेदरे, पोशि/संकेत कानडे, पोशि/ऋषिकेश सदामते व पोशि/अभिजित माळकर यांना त्यांचे बातमीदाराकडून बातमी मिळाली की, इसम नामे किरण घाडगे व विरू मोरे, रा फलटण हे दोघे नेर्ले येथील कासेगाव ते पेठ हायवे लगत असलेल्या हर्ष हॉटेल जवळ तयार गांजा माल विक्री करीता घेवुन येणार आहेत. नमुद पथक मिळाले बातमीप्रमाणे नमूद ठिकाणी सापळा लावून थांबले असता दोन इसम सदर ठिकाणी संशयितरित्या येत असताना दिसले. त्यातील एका इसमाने पाठीवर सॅक अडकवलेली दिसली. संशय आल्याने सहा. पोलीस निरीक्षक, जयदीप कळेकर व पथकाने सदर इसमांना ताब्यात घेवून त्यांची चौकशी केली असता त्यांनी त्यांचे नाव किरण भिमराव घाडगे व विरू शिवाजी मोरे, रा. कुंभार भट्टी, फलटण, ता फलटण, जि सातारा अशी सांगितली. त्यांची अंगझडती घेतली असता, त्यांचे कब्जातील सॅकमध्ये दोन खाकी रंगाचे चिकटपट्टीने गुंडाळलेले पॅकेटमध्ये तयार गांजा माल मिळून आला. त्यांना सदर गांजा मालाबाबत विचारले असता सदर माल नातेवाईक युवराज मोरे, रा फलटण, जि – सातारा यांच्याकडून विकत घेवून याठिकाणी गांजा विक्रीस आलेचे कबुली दिली. सदर आरोपी व गांजा माल सहा. पोलीस निरीक्षक, जयदीप कळेकर यांनी जप्त केला. पुढील तपासकामी आरोपी व जप्त मुद्देमाल कासेगाव पोलीस ठाणेचे ताब्यात देण्यात आला असून अधीक तपास कासेगाव पोलीस ठाणे करीत आहेत.
पोलीस निरीक्षक , स्था. गु. अ. शाखा, सांगली
कारवाई करणारे अधिकारी आणि अंमलदार पोलीस अधीक्षक संदीप घुगे, मा. प्रभारी पोलीस अधीक्षक रितु खोखर यांचे मार्गदर्शानाखाली पोनि/ सतिश शिंदे, सपोनि/ जयदीप कळेकर, सपोनि/ नितीन सावंत, पोहेकों / संजय पाटील, संदीप पाटील, अतुल माने, सचिन धोत्रे, हणमंत लोहार, शिवाजी सिद पोना / रणजित जाधव, पोकॉ अजय बेंदरे, संकेत कानडे, ऋषीकेश सदामते, अभिजित माळकर पोशि/कॅप्टन गुंडवाडे, विजय पाटणकर आदीने केली.