मिरज : प्रतिनिधी

आरग, ता. 17 : ह. भ. प. संभाजी तांदळवाडे रा.आरग तालुका मिरज जिल्हा सांगली यांची श्रीगुरु देहूकर महाराज फड परंपरा पंढरपूर चे चोपदार म्हणून नियुक्ती झाली. जगतगुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचे दहावे वंशज _श्रीगुरु संजय महाराज देहूकर व अकरावे वंशज श्रीगुरु चैतन्य महाराज देहूकर यांच्या हस्ते सत्कार समारंभ पंढरपूर येथे पार पडला.
संभाजी तांदळवाडे हें गेले 20 वर्षे झाले. श्री विठल मंदिर आरग येथे आपल्या श्रद्धानि मनानी तिथे नित्य सेवा करत असतात. संभाजी तांदळावाडे हें लहान मोठे युवा ना मार्गदर्शन करून वारकरी सांप्रदायच्या मार्गांवर नेण्याचा प्रयत्न कायम असतो युवाना व्यसना पासून दूर राहण्याचा संदेश देत असतात. आज त्यांच्या नेतृत्वात युवा वर्ग तुळशीची माळ घालून मंदिरात सेवा करत आहे आहे.